Monday, April 5, 2010
कोकण चा कॅलिफोर्निया कधी होणार
रविवारचा सकाळ पुरवणी मधला कोकण बद्दल चा लेख फार अप्रतिम होता. खरोखर कोकण चा कॅलिफोर्निया आपले सरकार करू शकते पण सगळ्या राजकारणी माणसांमध्ये ते इच्चा शक्ती अजिबात नाहीये नाहीतर जर गोव्या सारखे छोटा राज्य पर्यटनातून उत्पन्न मिळवत असेल तर महाराष्ट्र सारखा राज्य का नाही ? पण... हा पण खूप मोठा आहे कारण साग्ल्येच राजकारणी लोक सारखे आहेत समाजाचा विकास कोणालाच नको आहे त्यांना हवा आहे फक्त आपला स्वताचा विकास आणि तो झाला म्हणजे बाकी सामान्य लोक जगले वाचले ह्याचा त्यांना काहीही देणा घेणा नाही. आज कोकणामध्ये पर्यटनाला प्रचंड संधी आहे आणि हे मी स्वतः अनुभवले आहे. अत्यंत सुरेख सागर किनारे, आणि इतर पर्यटन स्थळे आहेत , पण ह्या सगळ्याचा नित विकास न झाल्यामुळे गोव्या सारखे पर्यटकांचा इथे ओघे नाही कारण एकच, राजकीय इच्छाशक्ती चा अभाव. सध्या एकही असा नेता नाही कि जो काहीतरी समाजासाठी करून दाखवेल, ह्या सगळ्या गोष्टीची प्रचंड चीड येते पण एक सामान्य नागरिक म्हणून मी काहीही करू शकत नाही ह्याचा राग येतो आणि मी नुसताच गप्पा बसतो. कधीतरी ह्या सगळ्या राजकीय पुढार्यांना देव बुद्धी देईल आणि कोकण चा कॅलिफोर्निया होईल अशी प्राथना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment